11 Years Old Boy Physically Assaulted By Teacher Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: ११ वर्षांच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार, डान्स टीचरला अटक; पुण्यातील संतापजनक घटना

11 Years Old Boy Physically Assaulted By Teacher: पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला वारजे पोलिसांनी अटक केली.

Priya More

पुण्यामध्ये ११ वर्षांच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील कर्वनगरमध्ये असलेल्या एका नामांकित शाळेमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू असताना हा सर्व प्रकार समोर आला. या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका नामांकित शाळेत विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने हे घाणेरडे कृत्य केले आहे. ११ वर्षांच्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला.

धक्कादायक बाब म्हणजे घाबरलेल्या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना देखील सांगितला नाही. या घटनेची माहिती कळताच त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ वारजे पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंगेश साळवे या डान्स टीचरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पोलिसांकडून सध्या आरोपी शिक्षक मंगेश साळवेची चौकशी सुरू आहे. यापूर्वी सुद्धा या शिक्षकाने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अशाप्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात पोलिसांकडून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT