Pune Crime Against Women Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime Against Women: धक्कादायक! पुण्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, दररोज होतेय 9 गुन्ह्यांची नोंद

धक्कादायक! पुण्यात महिलांवरील अत्याचारात वाढ, दररोज होतेय 9 गुन्ह्यांची नोंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> सचिन जाधव

Pune Crime News: राज्यात महिला बेपत्ता होण्याविषयी सध्या राज्यात जोरदार राजकीय आरोप - प्रत्यारोप होत आहेत. अशातच पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. महिला अत्याचाराच्या दररोज सरासरी ९ घटना शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत असून त्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे नोंदणीच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

यात प्रामुख्याने विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देणे, अत्याचार, विनयभंग आणि अपहरण अशा घटनांचा समावेश आहे. मे महिन्यातील २० दिवसांत महिलांबाबत वेगवेगळ्या १७५ घटना पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक घटना होत असतात. अनेकदा तरुणी, अल्पवयीन मुली, महिला या आपली बदनामी नको, म्हणून त्या कोणाला न सांगता अशा घटना सहन करून शांत राहतात.  (Latest Marathi News)

विवाहितेचा छळ होण्याच्या घटनांमध्ये या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत मोठी वाढ झालेली दिसून आली आहे. माहेरहून पैसे आणावे यासाठी अजूनही महिलांचा छळ केला जात आहे. अनेकदा लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच विवाहितेचा छळ सुरू झाल्याचे या प्रकरणांमध्ये दिसून येते. अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत. (Pune News)

या वर्षातील चार महिन्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, गर्दी - मारामारी अशा ५६८ गुन्ह्यांची नोंद शहर पोलिस दलात झाली होती. त्याचवेळी महिलांविषयक ७९५ गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येते.  (Viral Video News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

SCROLL FOR NEXT