Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News : प्रियकराचा प्रताप! प्रेयसीच्याच घरी मारला 14 लाखांचा डल्ला

ब्रेकअप झाल्याचा राग मनात धरून एका प्रियकराने प्रेयसीच्याच घरात चोरी केल्याचा प्रकार पुण्यातून उघडकीस आलाय.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही

Pune Crime News : ब्रेकअप झाल्याचा राग मनात धरून एका प्रियकराने प्रेयसीच्याच घरात चोरी केल्याचा प्रकार पुण्यातून (Pune) उघडकीस आलाय. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रियकरास ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून त्याच्याकडून २८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. (Pune News Today)

सतीश परदेशी असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील आंबेगाव येथील लक्ष्मी गार्डन सोसायटी भागात २ ऑक्टोबर रोजी घरफोडीची घटना घडली होती. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस चोरट्याचा शोध घेत होते.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर संशयित व्यक्ती दिसून आली. परिसरातील इतर सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटली. (Maharashtra News)

त्यानुसार पोलिसांनी सतीश परदेशी याला ताब्यात घेतलं असता, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २८ तोळे सोन्याचे दागिने, रोकड असा १४ लाख ६७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

आरोपी सतीश याचे तक्रारदार तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. याचा बदला घेण्यासाठी आरोपी सतीश याने तरुणीच्या घरात चोरी करण्याचे ठरवले. सुमितने समाजमाध्यमावर चोरी कशी करावी, याची माहिती त्याने घातली. त्यानंतर त्याने वेशांतर करून तरुणीच्या घरात चोरी केली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT