Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा हडपसर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune Crime News : पुण्यात (Pune) बलात्काराच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने कोठडीच्या भिंतीवर व लोखंडी गजावर डोके आपटून घेत स्वत:ला जखमी केले. ही बाब गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या (Police) लक्षात आली. त्यानंतर जखमी झाल्यामुळे आरोपीला पोलिसांनी उपचारासाठी ससून रुग्णालयात (hospital) दाखल केले. ससून रुग्णालयाच्या बाथरूममध्ये त्यान आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

बाथरूममधील काचेने स्वत:च्या गळ्यावर जखमा करुन घेता या आरोपीने दुसर्‍यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अमोल क्षीरसागर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी अमोल राजू क्षीरसागर याला बलात्काराच्या घटनेमध्ये अटक केली होती. त्या आरोपीला हडपसर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

त्यावेळी त्याने लॉकअपमध्ये कोठडीच्या भिंतीवर व लोखंडी गजावर डोके आपटून घेत स्वत:ला जखमी केले. त्यामध्ये तो जखमी झाल्यावर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याने वॉशरूमला जात असल्याचे सांगून आतमध्ये खिडकीतील काच काढून घेत स्वतःच्या गळ्यावर वर करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

हा प्रकार प्रकार गुरुवारी दुपारी साडेचार ते रात्री ७ वाजेच्या दरम्यान घडला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल क्षीरसागर याला एका बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला हडपसर पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा हडपसर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT