Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune : महिलेच्या वेशात फिरत होता तरुण; स्थानिकांनी धू-धू धुतलं; Video Viral

मुलं पळवणाऱ्या टोळीचा भाग आहे असं समजून स्थानिकांनी या तरुणाला जोरदार चोप दिला.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील (Pune) खडकवासला धरण परिसरात एका परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा तरुण महिलेच्या वेशात फिरत असल्याने तो मुलं पळवणाऱ्या टोळीचा भाग आहे. असा आरोप करत त्याला स्थानिकांनी जोरदार चोप दिला आहे. (Pune News Today)

नेमकं काय घडलं?

खडकवासला धरण परिसरातील मागच्या बाजूला एक तरुण महिलेच्या वेशात फिरत होता. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी या तरुणाला विचारणा केली. त्यानंतर मुलं पळवणाऱ्या टोळीचा भाग आहे असं समजून स्थानिकांनी या तरुणाला जोरदार चोप दिला.

खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूवर असलेल्या पुलावर हा सगळा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये स्थानिक नागरिकांसह काही तरुण या महिलेच्या वेशात फिरणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. (Pune Crime News)

दरम्यान, या तरुणाला जिथे मारहाण झाली ती हद्द हवेली पोलिसांची की उत्तमनगर पोलिसांची याबाबत मात्र, अद्यापही स्पष्टता झालेली नाही. महिलेच्या वेशात फिरत असल्याने नागरिकांनी गैरसमजातून ही मारहाण केल्याची प्राथामिक समोर आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Maharashtra News Live Update: देशी कांद्यांचे भाव वाढल्याने इजिप्तचा कांदा एपीएमसीमध्ये दाखल

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

SCROLL FOR NEXT