Pune Police  Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: ९वीच्या विद्यार्थ्यांकडून लहान मुलांचं लैंगिक शोषण; पुण्यातील प्रसिद्ध शाळेतील संतापजनक घटना

Pune News: शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे.

Ruchika Jadhav

सचिन जाधव

Pune School:

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. पुण्यातील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडलीये. शाळेतील इयत्ता तिसरी आणि चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले आहे. शाळेतीलच इयत्ता ९वीच्या मुलांनी हे कृत्य केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील या शाळेत ७ ते ८ मुलांचं लैंगिक शोषण झालंय. मनसे कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलंय. पोलीस, पालक,मनसे कार्यकर्ते शाळेच्या आवारात जमले तसेच मोठी घोषणाबाजी सुरू केली. पालकांनी शाळेत येऊन ज्या मुलांनी हे कृत्य केलंय त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी केलीये.

गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेत लैंगिक शोषण सुरु असल्याचा आरोप पालक करतायत. अनेक पालकांनी काही वेळ शाळा बंद केली होती. पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शाळेत पोलिसही दाखल झाले. तसेच दोषींवर योग्यती कारवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

वसतीगृह केअर टेकरकडूनच पाच मुलींचे लैंगिक शोषण

जळगावच्या एरंडोल तालुक्यातील मुलींच्या वसतीगृहातही काही दिवसांपूर्वी अशीच क्रूर घटना घडली होती. मुलींच्या वसतीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. वसतीगृहातील केअर टेकरनेच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. पोलिसांत केअर टेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: अभिमानास्पद! माढ्याच्या ४ सुपुत्रांची उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती; प्रेरणादायी प्रवास वाचा

Beed Politics : बीडमध्ये मुंडे भावाबहिणीची युती, परळी नगरपरिषद राखण्यात यश मिळणार का? VIDEO

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT