Crime Scene saam tv
मुंबई/पुणे

Pune Theft News: माझी आई घरी नाही, मला जेवण द्या; असं म्हणत तीन चोरटे घरात घुसले अन्...

Theft News: महिलेच्या मोबाईलसह १५ हजारांची रोख रक्कम देखील चोरण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Pune News: पुण्यातून चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. माझी आई गावी गेली आहे आणि मला भूक लगलीये. त्यामुळे मला जेवण द्या असं सांगत चोरट्यांनी महिलेचे दागिने चोरले आहेत. यामध्ये महिलेच्या मोबाईलसह १५ हजारांची रोख रक्कम देखील चोरण्यात आली आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १६ मे रोजी वडगाव शेरी येथील दिगंबर नगर पुण्यामध्ये ही घटना घडली आहे. एक जेष्ठ महिलेबरोबर (वय ७५) ही घटना घडलीये. महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, महिलेने त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला घरातील रंग आणि सफाई कामासाठी बोलावले होते. १२ मे रोजी तो व्यक्ती आला आणि त्याने थोडे काम केले. सफाईचे बरेच काम बाकी होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी हे काम पूर्ण करेल असे त्याने महिलेला सांगितले.

त्यावर तो व्यक्ती दूसऱ्या दिवशी न येता १६ मे रोजी महिलेच्या घरी आला. यावेळी महिला घरी एकटी असणार हे त्याला माहिती होते. आपले काम भरभर व्हावे म्हणून सोबतीला त्याने आणखीन दोन व्यक्तींना देखील आणलं होतं.

घरी आल्यावर त्याने वृद्ध महिलेला सांगितले की, माझ्या घारी कोणी नाही. आई बाहेर गेली आहे आणि मला भूक लागलीये. जेवण असेल तर मला द्या, असं तो म्हणाला. त्यावर महिलेने लगेचच त्याला जेवणासाठी बसवले आणि जेवण देऊ लागली. जेवण वाढत असताना महिला किचनमध्ये गेली त्यानंतर या चोरट्यांनी त्यांच्या घरातील फोन, दागिने, आणि रोकड असा एकून ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT