Pune Latest News Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime: भरचौकात तरुणावर ३६ वार... १० वर्षापूर्वीच्या खून प्रकरणात चौघांना जन्मठेप; पुण्याला हादरवणारे हत्या प्रकरण काय?

Pune Latest News: पुणे शहरात २०१० मध्ये झालेल्या भयंकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. यामध्ये न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Gangappa Pujari

Pune Crime News: पुणे शहरात २०१० मध्ये झालेल्या भीषण खूनाचा तब्बल १० वर्षांनी निकाल लागला. पुर्ववैमनस्यातून झालेल्या वादातून तब्बल ३६ वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना कोर्टाने जन्मठेप आणि प्रत्येकी दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. (Crime News In Marathi)

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरत (Pune) राकेश नामदेव घुले (वय २५, रा. बोपखेल) या तरुणाचा २१ नोव्हेंबर २०१० मध्ये खून करण्यात आला होता. त्याआधी मृत राकेश याने आरोपींवर बोपखेल येथे वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. त्याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात राजेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी संगनमत करून २१ नोव्हेंबर २०१० ला राजेशवर थेरगावमधील काळेवाडी फाटा येथे हल्ला केला. आरोपींनी राकेशच्या हातावर, डोक्यावर, पाठीवर कोयत्याने तब्बल ३६ वार करून त्याची निर्घृण हत्या केली. गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या कोयत्यांपैकी दोन कोयते गुन्ह्याच्या घटनास्थळी सापडले होते.

या प्रकरणात एकूण सात जणांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींपैकी एक जण गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन होता तर, एका आरोपीचा सुनावणीवेळी मृत्यू झाला. अन्य एका आरोपीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याची सुनावणी स्वतंत्र घेण्यात येत आहे. तर गुन्ह्यातील उर्वरित चार आरोपी सप्टेंबर २०१२ पासून १६ फेब्रुवारी २०१९ पर्यंत कारागृहात होते.

या प्रकरणी आता न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून चौघांनाही जन्मठेप आणि दोन लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. हैदर जावेद सय्यद (वय १८, रा. विजयनगर, काळेवाडी), विक्रम ऊर्फ विक्की नंदू बिहारी ऊर्फ भिलारे (वय २१), साजीश अशोक कुरवत (तिघेही रा. काळेवाडी) आणि अविनाश गौतम बनसोडे (वय १८, रा. हिंद केसरीनगर, बोपखेल) अशी जन्मठेप झालेल्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Pack लावल्यावर त्वचा कोरडी होते? मग मऊ अन् तजेलदार त्वचेसाठी 'हे' पदार्थ फेस पॅकमध्ये मिक्स करायला विसरू नका

काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

Maharashtra Live News Update : . चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT