pune crime news  saam tv
मुंबई/पुणे

पुणे हादरलं! १७ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील (Pune) लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला. थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. ( Pune Crime News In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी पहाटे काही नागरिकांना थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर असणाऱ्या मोकळ्या जागेत एका मुलीचा मृतदेह आढळला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांनतर घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांचे (Police) एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांसोबतच डॉग स्कॉड देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, मृत तरुणी ही अंदाजे १७ वयोगटातील आहे. अज्ञात आरोपींनी अतिशय मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची दिसत आहे. मृत तरुणीच्या चेहऱ्यावर दगडाने वार केल्याच्या देखील खुणा दिसत आहेत. या तरुणीवर अत्याचार झालेत का ? याची शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस या तरुणीची ओळख प्रयत्न करत आहे. मात्र, तरुणीच्या हत्येनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Threat Call: बादशाहनंतर आणखी एका प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी; फोनवरून दिला सावध राहण्याचा इशारा

Viral Video: बोलता बोलता अचानक खाली कोसळली महिला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Vatana Batata Bhaji Recipe: गुढीपाडव्याला पुरी सोबत खाण्यासाठी बनवा स्पेशल वटाणा बटाटा भाजी, सोपी आहे रेसिपी

Water Metro : मुंबईकरांचा प्रवास आता लाटांवरून! 'वॉटर मेट्रो'साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन, ३ टप्प्यांत बदलणार शहराचा चेहरा

Maharashtra Live News Update : परभणीत एलपीजी गॅस दरवाढीच्या विरोधात ऑटो चालकांचा संप

SCROLL FOR NEXT