Vanraj Andekar Killed Case Update Saam Tv
मुंबई/पुणे

Vanraj Andekar Case: वनराज आंदेकरांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, हत्येमागचा खरा सूत्रधार आणि कारण उघड

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मंगळवारी रात्री १३ संशयिताना रायगड जिल्ह्यातून अटक केली. यामध्ये अनेक जण अल्पवयीन आहेत. या सर्वांना पुण्यात आणण्यात आले. अशामध्ये वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. सोमनाथ गायकवाडने वनराज आंदेकर यांची हत्या करण्यामागचे खरे कारण देखील समोर आले आहे.

वनराज आंदेकर यांचे हत्या प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. सध्या गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. सोमनाथ गायकवाड या प्रकरणात मुख्य सूत्रधार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात निखिल आखाडेचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

याप्रकरणात पुणे पोलिसांनी आधीच वनराज गायकवाड यांच्या दोन बहिणी, दोन मेहुणे आणि सोमनाथ गायकवाड यांना अटक केली आहे. हे पाचही आरोपी सध्या पोलिस कोठडीमध्ये आहेत. आता याप्रकरणात आणखी १३ संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या सर्वांना रायगड येथील एका हॉटेलमधून अटक केली. यामधील बरेच जण अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. त्यांची या हत्याप्रकरणात नेमकी काय भूमिका आहे याचा पोलिस तपास करत आहेत. अल्पवयीन असलेल्या आरोपींना बाय न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे.

कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. वनराजला संपवण्याचा कट कसा रचण्यात आला?, यासाठी शस्त्रे कुठून आली? यासर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, वनराज आंदेकर यांची रविवारी रात्री नऊच्या सुमारास हत्या करण्यात आली. नाना पेठेतील डोके तालीमजवळ त्यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. सोनिया दादा निवास येथे वनराज आंदेकर हे चुलत भाऊ शिवमसोबत बोलत उभे होते. त्यावेळीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT