loni kalbhoe police station Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime: खळबळजनक! दारूसाठी पैसे न दिल्याचा राग, तरुणाने जिवलग मित्रालाच संपवलं

Shocking Crime Over Liquor Money: पुण्यामध्ये तरुणाने दारूसाठी आपल्या मित्राची हत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू केला आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये तरुणाने आपल्या जिवलग मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूसाठी पैसे दिले नाही याचा राग आल्याने तरुणाने मित्राच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याची हत्या केली. लोणी काळभोर येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर योगेश लक्ष्मण काळभोर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. १५ डिसेंबरला योगेश काळभोर आणि सोमनाथ जाधव हे लोणी काळभोरमधील रायवाडी परिसरात असलेल्या दत्तात्रय कांबळे याच्या खोलीत दारू पित बसले होते. त्यावेळी आरोपी नंदू त्या ठिकाणी आला. त्याने योगेशला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

आपल्याला दारू पिण्यासाठी पैसे का दिले नाही अशी विचारणा त्याने केली. त्यानंतर त्याने धक्काबुक्की केली. त्या दोघांची तिथे झटापट झाली. यादरम्यान नंदूने योगेशच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक टाकला. या घटनेत योगेश गंभीर जखमी झाला. योगेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता या चौकशीत नंदूने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून योगेशच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन त्याची हत्या केली असल्याचे उघड झाले. पोलिसांनी नंदू म्हात्रे याला अटक केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल, ८ विद्यार्थ्यांचा झाला होता मृत्यू

चिनाब पुलामुळे काश्मीरच्या विकासाला गती; रेल्वे संपर्कातून पर्यटन आणि व्यापाराला चालना

Ladki Bahin Yojana: नवरात्रीनंतर दसराही गेला, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये कधी जमा होणार? वाचा अपटेड

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल अन् CNG च्या दरात वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Spicy Food: मसालेदार झणझणीत पदार्थ खाल्ल्यावर शरीरात काय घडतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT