Pune Shocking News  saam tv
मुंबई/पुणे

Shocking News: पुरूषांच्या टॉयलेटमध्ये जायचा, लघुशंका करणाऱ्यांचे व्हिडीओ काढायचा; नागरिकांनी पकडून धू-धू धुतला

Pune Crime News: पुण्यामध्ये एका तरुणाला नागरिकांनी चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या तरुणाने टॉयलेटमध्ये जाऊन लघुशंका करणाऱ्या पुरूषांचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला होता.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

टॉयलेटमध्ये जाऊन लघुशंका करणाऱ्यांचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढणाऱ्या तरुणाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या तरुणाविरोधात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये रविवारी हा किळसवाणा प्रकार घडला. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. पुण्यातील कोथरूड परिसरातील असलेल्या एका लॉन्समध्ये एक नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात होते. यावेळी एक तरुण स्वच्छतागृहात व्हिडिओ काढत असल्याचे काही जणांनी पाहिले. त्यानंतर चर्चा केल्यानंतर एकच गोंधळ उडाला.

यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला तेथील कामगारांनी पकडले आणि चोप दिला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता तर त्याने महिलांचा नव्हे तर पुरुषांच्या स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ काढला असल्याचे दिसून आले.

या तरुणाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला. याबाबत लॉन्समध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने पोलिसात फिर्याद दिली. यावरून मंगेश जवाहिरे (३५ वर्षे) या तरुणाविरोधात अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तरुणाने असे कृत्य का केले याबाबत पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT