Pune Koyta Gang Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात कोयत्या गँगची दहशत कायम, बीटी कवडे रोडवर ५० वाहनांची तोडफोड, पाहा CCTV Video

Pune Crime Koyta Gang: पुण्यातील बीटी कवडे रोड येथे हल्लेखोरांनी कोयत्या गँगची दहशत निर्माण करण्यासाठी, पन्नास वाहनांची तोडफोड केलीय. ज्यात गाडी आणि हॉटेलमधील वस्तूचं मोठं नुकसान झालं आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यात गुन्हेगारांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. शहरात किरकोळ कारणावरून भररस्त्यावर सर्रास कोयत्यानं वार केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी एका घटनेत युवतीवर कोयताने वार करून तिची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच बी. टी कवडे रोड येथे कोयत्या गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. हल्लेखोरांनी कोयत्या गँगची दहशत निर्माण करण्यासाठी पन्नास वाहनांची तोडफोड केलीय. ज्यात गाड्याचं मोठं नुकसान झालं आहे.

पुण्यातील बीटी कवडे रोड येथे कोयता गँगचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. बीटी कवडे रोड येथील लोकांमध्ये दहशत वातावरण निर्माण करण्यासाठी काही हल्लेखोरांनी गाड्यांची तोडफोड केली आहे. यात प्रामुख्यानं चारचाकी वाहने, बस, टेम्पो, रिक्षा आणि तीन ते चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झालंय. तसेच हॉटेलमध्ये जात कोयत्यानं वार करत काही वस्तुंचे देखील नुकसान केलंय. त्याचं सीसीटीव्ही फुटेजही सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

बी टी कवडे रस्त्यावर रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान दोन मुले हातात कोयता घेऊन फिरत होते. दिसेल त्या वाहनांवर वार करत चालत होते. ससाणे उद्यान ते बी टी कवडे या गजबजलेल्या रस्त्यावर दोन मुलांनी हे कृत्य केलं. गाड्यांची तोडफोड करीत हल्लेखोरांनी चायनिजच्या गाड्यावर वार करत एका हॉटेलमध्ये शिरले आणि तिथेही काही वस्तूंची तोडफोड केली.

त्यानंतर बसेरा कॉलनीत रस्त्याच्या कडेला लावलेल्या सर्व वाहनांवर वार करून हल्लेखोरांनी काचा फोडल्या. वाहने फोडताना काही नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोयता दाखवून धमकी देण्यात येत होती. त्यावेळी काही दुकानदार हल्लेखोरांना पकडण्यासाठी मागे धावले, त्यावेळी ते निगडे नगर येथील रिक्षात लपून बसले होते. पण काही वेळानंतर हल्लेखोरांचा शोध घेत नागरिकांनी एकत्र येऊन त्यांना पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी या प्रकरणात कौशल लांडगे (वय वर्ष २०). भीमनगर याला ताब्यात घेतले असून, एक अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतला आहे. आरोपींनी नशा केली होती. दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नीलकंठ जगताप यांनी कारवाई करत हल्लेखोरांना ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT