Pune Crime News  Saam Digital
मुंबई/पुणे

Pune Crime: कर्नाटकातून पुण्यात यायचा, हॉस्टेलमध्ये राहायचा; संधीचा फायदा घेऊन घरात घुसायचा अन्...

Pune Police: पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. कर्नाटकातील हा तरुण पुण्यातील एका हॉस्टेलवर राहायचा आणि पुण्यासह आसपासच्या परिसरात घरफोडी करायचा.

Priya More

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कर्नाटकातील २२ वर्षीय तरुण पुण्यामध्ये येऊन घरफोडी करायचा. या तरुणाला अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बंगळुरूमध्ये राहणारा तरुण व्यंकटेश रमेश (२२ वर्षे) पुण्यात यायचा. तो पुण्यातील एमआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या एका हॉस्टेलमध्ये राहायचा. याठिकाणी राहून तो घरफोड्या करायचा. आंबेगाव पोलिसांनी व्यंकटेश्वर रमेशला अटक केली. त्याने पुण्यातील आंबेगाव, बावधन, लोणीकंद परिसरात घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले. व्यंकटेश अनेक ठिकाणी घरफोड्या करून घरातील पैसे आणि दागिने लंपास करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात भरदिवसा एका घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घरफोडीचा तपास करत असताना पोलिसांनी व्यंकटेशला अटक केली. त्याच्याकडून २ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याने आतापर्यंत फक्त पुण्यातच नाही तर आंबेगाव आणि लोणीकंद परिसरात चोरी केल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर, खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

Washim Crime: अनैतिक संबंधात अडथळा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं, मृतदेह शेतात फेकला

SCROLL FOR NEXT