Hadapsar Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Crime News: पीएमपी बसमध्ये चोरी, महिलेच्या पर्समधून १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune: पुणे पीएमपी बसमधून एका महिला प्रवाशाच्या पर्समधून चोरट्यांनी सुमारे एक लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. कात्रज ते गाडीतळ हडपसर प्रवासादरम्यान रविवारी हा प्रकार घडला असून याबाबत हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी (ता. हवेली) येथील महिला पीएमपी बसने कात्रज येथून हडपसरकडे या मार्गावर प्रवास करीत होती. यावेळी प्रवासादरम्यान रस्त्यात बसचा सीएनजी संपला. ज्यामुळे बस थांबल्याने काही प्रवासी खाली उतरले. त्यावेळी ही महिलाही बसमधून खाली उतरली. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने या महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरी झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली असून फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सखोल तपास हडपसर पोलिस करत आहेत. (Hadapsar)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT