Yavat Chaddi Baniyan Gang Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: चड्डी-बनियन गँगचा हैदोस, घरात घुसून ५ जणांवर दगड- काठ्यांनी हल्ला; एकाचा मृत्यू ३ गंभीर

Yavat Chaddi Baniyan Gang Attack: यवतमध्ये चड्डी- बनियन गँगने घरात घुसून कुटुंबीयांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पुणे जिल्ह्यांतल्या यवतमध्ये ही घटना घडली.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातल्या दौंडमध्ये चड्डी-बनियन गँगची दहशत पसरली आहे. चड्डी-बनियन गँगने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. रात्री उशिरा घरामध्ये घुसून चड्डी-बनियन गँगमधील तिघांनी ५ जणांवर प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस सध्या तपास करत आहेत.

दौंड तालुक्यातील यवत गावातील यवत स्टेशन हद्दीत राहणाऱ्या चव्हाण यांच्या घरात रात्रीच्या वेळी ३ अज्ञात चड्डी बनियन गँगची लोकं घुसले. या गँगने चव्हाण यांच्या घरातील ५ जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील एकाचा मृत्यू झाला.

यवतमधील निळकंठेश्वर मंदिरजवळ शेतात जाणाऱ्या रस्त्यावर रात्री १०.४५ च्या सुमारास शेतात राहणाऱ्या शशिकांत चव्हाण यांच्या घरात ३ जण घुसले. चड्डी- बनियन गँगने दगड, काठ्यांनी चव्हाण कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत चव्हाण कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत. जखमींमधील अविनाश शशिकांत चव्हाण ( ३४ वर्षे) या तरुणाचा मृत्यू झाला.

या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनास्थळी यवत पोलिसांचे पथक दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांना अर्धसत्य माहिती मिळतेय”

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

SCROLL FOR NEXT