Pune Crime 
मुंबई/पुणे

Pune Crime: दोन हजार रुपयांसाठी ब्लॅकमेलिंगचा प्रकार! सोशल मीडियावर महिलेचा नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime: पुण्यात एक महिलेला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. सोशल मीडियावर तिचे मॉर्फ केलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आलाय. याप्रकरणी हडपसर येथील एका १९ वर्षीय मुलाला वानवाडी पोलिसांनी अटक केलीय. अटकेत असलेला मुलगा एका महिलेला ब्लॅकमेल करत होता. सोशल मीडियावर मॉर्फ केलेले नग्न फोटो व्हायरल करण्याच्या नावाने तो महिलेला ब्लॅकमेल करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेल करणारा मुलगा १९ वर्षाचा असून ते बिहारचा रहिवाशी आहे. ब्लॅकमेल आणि धमकी देण्याच्या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. १३ मार्चला या मुलाला अटक करण्यात आली.

दोन हजार रुपायांसाठी ब्लॅकमेल

अटकेत असलेला मुलगा एका महिलेला तिचे मॉर्फ केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. जर फोटो व्हायरल होऊ द्यायचे नसतील तर २ हजार रुपये दे, अशी धमकी पीडित महिलेला देत होता. या मुलाने पीडितेचे एडिट केलेले फोटो महिलेच्या भावाला पाठवले होते, असं पोलीस तपासात समोर आले आहे.

तक्रारदार महिलेचा फोटो आणि नाव वापरून आरोपीने एक इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं होतं. त्यानंतर त्याने पीडितेला धमकीचा मेसेज केला. या मेसेजमध्ये त्याने दोन हजार रुपये दिले नाहीतर मॉर्फ केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर पोस्ट करेल अशी धमकी दिली होती. महिलेला धमकावण्यासाठी त्याने सोशल मीडियाच्या अकाउंटवरून एक फोटो तिच्या भावालाही पाठवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

Abhishek Sharma : १० षटकार, १० चौकार अन् २०० चा स्ट्राईक रेट; अभिषेकच्या शतकी तडाख्यात दिल्ली उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT