Hadapsar Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात पुन्हा गॅंगवार! मर्डरचा रिप्लाय मर्डरने म्हणत भर रस्त्यात कोयत्याने वार; परिसरात खळबळ

Pune News Update: पोलिसांकडून वारंवार कारवाई करुनही पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढच होत आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune News: पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शहरात कोयता गॅंगद्वारे गुन्ह्याच्या घटना वारंवार घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून वारंवार कारवाई करुनही या घटनांमध्ये वाढच होत आहे. अशीच आणखी एका गॅंगवारची भयंकर घटना शहरात समोर आली आहे. पुण्यातील हडपसर (Hadapsar) भागात मर्डरचा रिप्लाय मर्डरने म्हणत कोयत्याने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, 2020 साली झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेला परंतु आता जामिनावर शुभम भोंडे हा तरुण सध्या बाहेर आला आहे. त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. पुणे शहरातील हडपसर भागात गँगवॉरचा प्रकार घडला. मर्डरचा रिप्लाय मर्डरचं म्हणत सराईत गुन्हेगारांकडून कोयत्याने वार करण्यात आले.

रिक्षाला दुचाकी आडवी लावून रिक्षातून बाहेर पडणाऱ्या शुभम भोंडे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तू अनिकेतचा मर्डर केला आहे ना, आता बघ मर्डरला मर्डर रिप्लाय देणार" असे म्हणून त्याच्यावर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्यात आले.

दरम्यान, या प्रकारामुळे पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरु केला आहे. मागच्याच आठवड्यात अशाच गॅंगवारची घटना समोर आली होती. यामध्ये एका तरुणाच्या हाताचा पंजाच कोयत्याने तोडला होता.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT