Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

घरात झोपलेल्या सावत्र आईसोबत मुलाचं भयंकर कृत्य; पुण्यातील थरारक घटना

सदरील घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली

Satish Daud

पुणे : पुण्यातील (Pune) भोर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका सावत्र मुलाने आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मुलाने झोपेत असलेल्या असलेल्या सावत्र आईच्या डोक्यात (Crime) दगडी पाट्याने वार केला, यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. सदरील घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. (Pune Crime News)

रेश्मा अंकुश शिंदे (वय 36) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. तर शिवम अंकुश शिंदे असं फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रेशमा ह्या घरात झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांचा सावत्र मुलगा शुभम याने घरातील दगडी पाट्याने रेश्मा यांच्या डोक्यात वार केला. (Pune Latest Crime News)

या घटनेत रेश्मा यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर शिवम हा घरातून पसार झाला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिवम विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने भोर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून शिवमने आपल्या आईचं खून का केला? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Controversy: पुतळ्यावरुन जातीय राजकारण पेटलं; अंजनगावातील जमिनीचा नेमका वाद काय?

Fansachi Rassa Bhaji Recipe : कोकणात बनवतात तशी फणसाची झणझणीत रस्सा भाजी, चाखाल अस्सल गावरान चव

SCROLL FOR NEXT