Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Pune Corona Update: पुण्यातील जलतरण तलाव, उद्याने सुरु होणार!

पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरू होणार, गर्दी अधिक झाली तर निर्णय घेऊ असेही पवार म्हणाले.

अमोल कविटकर, पुणे

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कोरोना आढावा बैठक घेतली आहे. त्यात त्यांनी अनेक गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे जलतरण तलाव सुरु करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुरू होणार, गर्दी अधिक झाली तर निर्णय घेऊ असेही पवार म्हणाले.

त्याचबरोबर उद्याने सकाळच्या सत्रात सुरु राहणार असल्याचीही माहिती अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. पुणे मनपा हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू राहतील आणि याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असे अजित पवारांनी सांगितले आहे. रुग्णसंख्या अधिक असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. दरम्यान राज्यातील शाळा स्थानीक परिस्थीती पाहून सुरु करण्याला शिक्षण विभागाने परवानगी दिलेली आहे. त्याच अनुषंगाने जिथे रुग्णसंख्या कमी आहे, तिथे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

PM Modi : ६ दिवस, ५ देश... पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यासाठी रवाना

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हे व्यायाम चुकूनही करू नयेत, डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Mumbai : मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; बेकरी मालकाचं भयंकर कृत्य

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT