Pune cooperative bank fraud Saam TV
मुंबई/पुणे

Pune Bank Scam : पुण्यात बँकेत महाघोटाळा! तब्बल ३४.७७ कोटींचा दरोडा; पोलिसांच्या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ

Pune cooperative bank fraud : पुण्यातील सहकार क्षेत्रातील बँकेच्या ऑडिटमध्ये तब्बल ३४.७७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. २०१८ ते २०२५ दरम्यान गैरवापराचे आरोप करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Pune cooperative bank ₹34.77 crore scam : पुण्यातील एका सहकार क्षेत्रातील बँकेत तब्बल ३४.७७ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. बँकेच्या वार्षिक आणि विशेष लेखापरीक्षणादरम्यान (Audit) ही कोट्यवधी रुपयांची हेराफेरी समोर आली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बँकेच्या २ अधिकाऱ्यांसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध फसवणूक आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेच्या निधीमध्ये परस्पर फेरफार करून आणि बनावट नोंदींच्या आधारे ही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्राथमिक आरोप आहे. TOI च्या वृत्तावुसार, पुणे पोलीस सध्या या संपूर्ण घोटाळ्याचा तपास करत आहेत. जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत पुणे शाखेत ३४.७७ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात बुधवारी याबाबत एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) तपास हाती घेतला. ५३ वर्षीय बँक ऑडिटरने या घोटाळ्याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. बँकेच्या प्रभात रोड शाखेच्या नुकत्याच करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये हा घोटाळा समोर आला. दोन अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ७ वर्षात ३४.७७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता.

एफआयआरनुसार, आरोपी अधिकाऱ्यांनी फसवणूक करण्यासाठी वित्तीय संस्थेतील आपल्या पदांचा गैरवापर केला. त्यांनी कथितरित्या स्वतःला बिनव्याजी कर्ज मंजूर केले. अनधिकृतरित्या काही जणांना शून्य-व्याज कर्जे दिली. तसेच बँकेच्या उपकंपन्या म्हणून बनावट कंपन्या भासवण्यासाठी कॉर्पोरेट तपशील खोटे बनवले. आरोपींनी खोटे रिपोर्ट तयार केले, बँकेचा देखभाल खर्च फुगवून दाखवला. व्यवस्थापनाच्या माहितीशिवाय गहाण ठेवलेल्या मालमत्ता विकल्या आणि विशिष्ट कर्जदारांच्या खात्यांमध्ये अनधिकृतपणे अतिरिक्त निधी जमा केल्याचा आरोप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमपीएससी सचिवांना काळे फासल्या प्रकरणी ३ जणांना अटक

Political News : शिंदेंसेनेच्या नेत्याला अटक, घराबाहेर सापडली ड्रग्सने भरलेली बॅग; राजकारणात खळबळ

3 Gram Gold Mangalsutra: 3 ग्रॅम सोन्यामध्ये महिलांसाठी सुंदर मंगळसूत्र; पाहा लेटेस्ट 5 डिझाइन्स

Manoj Jarange: ठरलं! जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, उद्या ठरणार मोर्चाचा मार्ग अन् ठिकाण

Cotton Trendy Saree: सणासुदीला दिसा स्टायलिश अन् कम्फर्टेबल; कॉटन साडीचे 'हे' ७ डिझाइन्स ठरतील परफेक्ट

SCROLL FOR NEXT