CNG pump  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune CNG Pump : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून 'या' भागातील सीएनजी पंप अनिश्चित काळासाठी बंद

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यात सीएनजी पंप चालकांनी बेमुदत पंप पुकारला आहे.

साम टिव्ही

सचिन जाधव

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. पुण्यात सीएनजी पंप चालकांनी बेमुदत पंप पुकारला आहे. त्यामुळे पुण्यातील ग्रामीण भागातील सीएनजी पंप उद्यापासून अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. सीएनजी पंप बंद राहणार असल्याने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील (Pune) ग्रामीण भागातील सीएनजी (CNG) पंप चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे उद्यापासून पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप बंद राहणार आहे. टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने पुणे ग्रामीणमधील सर्व पंप चालकांनी बेमुदत संप पुकारला आहे.

पुणे शहरातील 'एमएनजीएल'ची सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. टोरंट कंपनीने नफ्फ्याचा हिस्सा न दिल्याने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच सीएनजी पंप बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा चालकांचा इशारा दिला आहे.

पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले, 'उद्यापासून टोरंट कंपनीच्या डीलरने सीएनजी खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने १-११-२०२१ रोजी सीएनजी विक्रीतील नफ्फ्याच्या हिस्साचं सुधारित परिपत्रक जारी केलं होतं. त्यानंतरही टोरंट कंपनीने एकही रुपया वाढवून दिला नाही'.

'टोरंट कंपनीशी चर्चा करून अनेक संप मागे घेतला. पण आता सीएनजी चालकांचं खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे प्रत्येक सीएनजी पंप चालकांचं २० लाखांचं नुकसान झालं आहे. यामुळे सीएनजी पंप चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे सीएनजी पंप चालक बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे ध्रुव रुपारेल यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT