Jayant Patil  SAAM TV
मुंबई/पुणे

Jayant Patil: 'पक्ष चोरणाऱ्यांना जनता धडा शिकवेल...' जयंत पाटील यांचा हल्लाबोल; भाजपवरही केली जोरदार टीका

भाजपच्या हातून ही निवडणूक गेली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री रोज इकडे येत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली..

Dnyaneshwar Choutmal

Pune By Election: राज्याच्या राजकारणात सध्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपा नेत्यांनी पुण्यात तळ ठोकला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही भाजपला कडवा प्रतिकार दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) आज पुण्यात दाखल झाले आहेत, यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप तसेच शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याहस्ते आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी शिंदे - फडणवीस सरकार जोरदार हल्लाबोल केला..

काय म्हणाले जयंत पाटील...

यावेळी "भाजपच्या हातून ही निवडणूक गेली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री रोज इकडे येत आहेत, असे म्हणत भाजपला धडाक कसब्यातील जनता धडा शिकवेल," असा इशारा त्यांनी यावेळी दिला...

यावेळी त्यांनी शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केला. "उद्धव ठाकरे जिकडे तिकडे जनता जाईल,पक्ष नाव चिन्ह यापेक्षा त्याच काम मोठ आहे,सुप्रीम कोर्टात आयोगा बाबात अंतिम निर्णय होणे बाकी आहे, पक्ष चोरून घेऊन गेले आहेत त्यांना जनता धडा शिकवेल," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

त्याचबरोबर, " देशात भाजपची संख्या कमी झाल्याने महाराष्ट्रात ४८ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र तीन पक्ष एकत्रित आल्यास भाजप ला केवळ १३ ते १४ जागा मिळतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला. (Pune News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT