Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune Swargate: लॉजवर महिलांचे छुपे व्हिडिओ आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती; दत्ता गाडेची कुंडली समोर

Datta Gade Criminal past: दत्ता गाडे शिरूर परिसरातील लॉजमध्ये जाणाऱ्या महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा. तसेच विवाहबाह्य संबंध ठेवत असलेल्या महिलांवर पाळत ठेवायचा.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत झालेल्या तरूणीवर अत्याचार प्रकरणाचे अनेक बाबी समोर येत आहे. दत्ता गाडे कोण? त्यानं आधी किती गुन्हे केले? याआधीही महिलांसबोत त्यानं हे कृत्य केलं आहे का? आरोपी गाडेची हळूहळू कुंडलीच समोर येत आहे.

अशातच दत्ता गाडे संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. दत्ता गाडे शिरूर परिसरातील लॉजमध्ये जाणाऱ्या महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा. तसेच विवाहबाह्य संबंध ठेवत असलेल्या महिलांवर पाळत ठेवायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्यानं २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करण्याआधी अनेक गुन्हे केले आहेत. दरम्यान, दत्ता गाडे संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. शिरूर परिसरामध्ये एका लॉजबाहेर बसून, तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा. विवाहबाह्य संबंध ठेवत असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा.

महिलांचे व्हिडिओ काढून तो ब्लॅकमेल करायचा आणि त्यांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून अनेक पीडित महिलांनी तक्रार दाखल केलेली नाही. यामुळे आरोपी दत्ता गाडेचा गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढलेला होता. मात्र, दत्ता गाडेचा पापाचा घडा भरला आणि तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badam Benefits: रोज सकाळी ५ बदाम खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

आधी १४ महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् मग स्वत: आयुष्याचा दोर कापला, सोलापुरातील धक्कादायक घटना

Bhakri Tips: तांदळाची मऊ, लुसलुशीत भाकरी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

New Pune Bengaluru Highway : पुण्यातून सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग जाणार, २०६ किमी लांब, ४२ हजार कोटींचा खर्च, वाचा नेमका मास्टरप्लान

SCROLL FOR NEXT