Pune Swargate Bus Deopt Case Update Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Swargate: 'आरोपीला फाशी दिली तरी चालेल, पण..'दत्ता गाडेचा भाऊ वाल्मिक नेमकं काय म्हणाला?

Swargate bus depot News: आरोपी दत्ता गाडेच्या बायकोनंतर गाडेच्या मामे भावाने प्रतिक्रिया दिली आहे. जे काही प्रकरण घडलं, त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या तरूणीवर बलात्कारप्रकरणी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. तपासात अनेक धागे दोरे सापडत आहेत. आरोपी दत्ता गाडेच्या बायकोनंतर गाडेच्या मामे भावाने प्रतिक्रिया दिली आहे.

'स्वारगेट डेपोमध्ये जो काही प्रकार घडला, याआधी दत्ता हा गुलटेकडी येथे भाजी विकत होता. जे काही प्रकरण घडलं, त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी. ज्या महिलेसोबत ही घटना घडली, तिला न्याय मिळायला हवा. याप्रकरणी सखोल चौकशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी दिली तरी चालेल. पण सत्य बाजू सगळ्यांसमोर आली पाहिजे'.

'त्या दिवशी नेमकं घडलं काय? याचा तपास व्हायला हवा. चौकशीनंतर मीडियानं नाण्याची दुसरी बाजू देखील दाखवावी. या घटनेमुळे आमच्या गावातील लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. घटना घडल्यानंतर दत्ता गाडे घरी आला होता, पण तो घरी आल्यावर काही बोलला नाही', असंही दत्ता गाडे याच्या भावाने सांगितलं.

दत्ता गाडेच्या पत्नीची प्रतिक्रिया

दत्ता गाडेच्या पत्नीनं बलात्कारप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अनेक सवाल उपस्थित केले आहे. 'ती तरूणी म्हणतेय माझ्या नवऱ्यानं तिच्यावर बलात्कार केलाय. पण बलात्कार केल्यानंतर त्या तरूणीचे कपडे फाटले आहेत का? तिच्या अंगावर ओरबडलेलं दिसत आहे का?

आधी तरूणी गेली, मग माझा नवरा गेला, दोन मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? असे अनेक सवाल दत्ता गाडेच्या बायकोनं उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT