Pune Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुणे पोलिसांची बुधवार पेठेत धाड, ११ बांगलादेशी महिलांना अटक

Budhwar Peth Crime: पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. बोगस आधार कार्ड आणि अनधिकृत वास्तवाचा भांडाफोड झाला असून चार अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.

Akshay Badve

  • बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

  • ११ बांगलादेशी महिलांसह २२ महिलांना ताब्यात

  • बोगस आधार कार्ड व अनधिकृत वास्तव उघड

  • चार अल्पवयीन मुलींची सुटका, नशेचे पदार्थ जप्त

  • पोलिसांकडून पुढील सखोल तपास सुरू

महाराष्ट्रात सध्या बांगलादेशी नागरिकांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतमधून दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेऊन चार अल्पवयीन मुलींची सुटका केली होती. अशातच आता पुन्हा एकदा २२ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यातील ११ महिला बांगलादेशी असून खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज फरासखाना, खडक पोलिसांनी बुधवार पेठेत छापेमारी केली. या छापेमारीत बोगस आधार कार्ड आणि कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या ११ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनधिकृतपणे वास्तव करून कुंटणखान्यात काम करत असल्याची माहिती आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी एकूण २२ महिलांना ताब्यात घेतले असून त्यातील ११ महिला बांगलादेशी असल्याचे तपासातून समोर उघड झाले आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

११ फेब्रुवारी रोजी दोन बांगलादेशी महिलांना अटक

बुधवारी ११ फेब्रुवारी रोजी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती आळा घालण्याच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा व परिमंडळ एकने पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात मध्यरात्री ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या ऑपरेशनमध्ये दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले असून, चार अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे; तसेच सात ग्रॅम चरस आणि नशेची इंजेक्शन्स जप्त करण्यात आली. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर पहाटे चार वाजेपर्यंत बुधवार पेठेतील ४१ इमारतींमध्ये आणि गल्लीबोळांत पायी पेट्रोलिंग करून झाडाझडती घेण्यात आली. ७००पेक्षा अधिक नागरिकांची कसून चौकशी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT