Pooja Khedkar Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: मोठी बातमी! IAS अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांची नोटीस; ऑडी कार तातडीने सादर करण्याचे आदेश VIDEO

IAS officer Pooja Khedkar To Produce Audi Car At Police Station: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. आता त्यांची कार पोलीस स्टेशनला हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Rohini Gudaghe

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर येतेय. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणींचा आलेख वाढत असल्याचं पाहायला मिळतोय. आता पूजा खेडकर यांची ऑडी कार पोलीस स्टेशनला हजर करण्याचे आदेश देण्यात आलेत. ऑडी कारसह कागदपत्रे तपासण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ

ऑडी कारच्या थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड या कंपनीला पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेची नोटीस (IAS officer Pooja Khedkar) प्राप्त झालीय. पूजा खेडकर यांनी या ऑडी कारचा कालच २७ हजार ६०० रुपये दंड भरलाय. पूजा खेडकर यांनी ऑडी कारला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासन बोर्ड लावला होता. त्यामुळे पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. याप्रकरणी त्यांची तडकाफडकी बदली वाशिमला करण्यात आलीय.

पुणे पोलीस आक्रमक

पूजा खेडकर यांनी अंशत: अंधत्व असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. परंतु सध्या ते सापडत नसल्याचं समोर आलंय. मागील काही दिवसांपासून पूजा खेडकर जास्तच चर्चेत (Pune News) आहेत. आता पूजा खेडकरांची ऑडी सादर करा, असे आदेश पुणे पोलिसांनी दिलेत. पूजा खेडकर या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे होत आहे. प्रक्षिणार्थी पूजा खेडकर यांनी गाडीवर अंबर दिवा लावल्याप्रकरणी पुणे पोलीस आक्रमक (IAS officer Pooja Khedkar Latest News) झालेत.

गाडी आणि कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश

पूजा खेडकर यांच्या आईवडिलांनी देखील शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर आलंय. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या आईला देण्यात आलेली रिव्हॉल्वर जप्त करणार असल्याची माहिती (Pooja Khedkar Case Update) मिळतेय. मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यांवर रिव्हॉल्वर रोखून धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. याप्रकरणात पुणे पोलीस अॅक्टीव्ह मोडमध्ये आलेत. तसंच पूजा खेडकर यांना गाडी आणि कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रक्ताचं पाणी होईपर्यंत वहिनींच्या पाठीशी उभे राहू : हसन मुश्रीफ

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

Monday Important Remedies: घरात पैशांची तंगी सुरू आहे? सोमवारी हे 5 उपाय करा, महादेवाच्या कृपेने होईल भरभराट

Jalna: जालन्यात ज्वालामुखी? जमिनीतून निघतोय ज्वलनशील पदार्थ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT