Amit Shah News saam tv
मुंबई/पुणे

Amit Shah Pune Visit: गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्यात मोठा बदल! सर्व बैठका रद्द; तातडीने दिल्लीला रवाना होणार

Home minsiter Amit Shah Pune Visit Schedule Changes: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले आहेत.

Prachee kulkarni

Amit Shah pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले आहेत. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तब्बल ४ तासांची राखीव वेळ ठेवली होती. मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये तातडीने मोठा बदल झाला असून चिंचवडमधील कार्यक्रमानंतर थेट दिल्लीला रवाना होणार आहेत..

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) काल संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा तब्बल चार तास वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर हॉटेलमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार होत्या. मात्र आता त्यांच्या या दौऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या असून अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.

अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे चिंचवडमधील कार्यक्रमानंतर अमित शहा यांनी तब्बल चार तासांची वेळ राखून ठेवली होती. त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! शिवसेना-मनसे केडीएमसीत किती लढणार? अधिकृत आकडा समोर

Vastu Tips : कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार करणे टाळावे? जाणून घ्या

Drishyam 3: अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर 'या' अभिनेत्याची 'दृश्यम ३'मध्ये एन्ट्री; अजयला देणारा काटें की टक्कर

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरूच!

Trendy Bags: ऑफिस, पार्टी किंवा फेस्टिव्हलसाठी 'या' बॅग्स प्रत्येक मुलींच्या कपाटात असल्या पाहिजेत

SCROLL FOR NEXT