Cbi Raids ON IAS Officer Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: मोठी बातमी! पुण्यात IAS अधिकाऱ्यावर CBI ची छापेमारी, लाच स्वीकारताना पकडलं

मोठी बातमी! पुण्यात IAS अधिकाऱ्यावर CBI ची छापेमारी, लाच स्वीकारताना पकडलं

गोपाल मोटघरे

Cbi Raid on Ias Officer Dr Anil Ganpatrao Ramod: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीआयने आयएएस (IAS) अधिकाऱ्यावर छापेमारी केली आहे. डॉ. अनिल गणपतराव रामोड असं आयएएस अधिकाऱ्यांचं नाव असून ते पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत. त्यांना सीबीआयने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रामोड यांनी हायवे लगत असलेल्या जागेचा परतावा लवकर मिळावा यासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीची दखल घेत सीबीआयने छापेमारी करत अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं आहे. (Latest Marathi News)

दोन दिवसांपूर्वी फौजदार पदी पदोन्नती अन् लाच घेताना अटक

दरम्यान, अलीकडेच साताऱ्यात फौजदार पदी पदोन्नती मिळून दोन दिवस झाले असतानाच लाच घेताना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. या लाचखोर फौजदाराला कौटुंबिक वादातून दाखल विवाहितेच्या छळाच्या गुन्ह्यात आरोपींना मदत करण्यासाठी 24 हजारांची लाज घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलं होतं.

या फौजदाराचे नाव मच्छिंद्र बाबुराव ससाने असं आहे. ज्या पोलीस ठाण्यात पुष्पगुच्छ स्वीकारले त्याच पोलीस ठाण्यात या फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तर दुसऱ्या घटनेत सिडको पोलीस ठाण्यातील फौजदार यांनी मालमत्तेविषयी दाखल तक्रार अर्जात गुन्हा न दाखल करण्यासाठी आणि दाखल केल्यास आरोपी न करण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजारांची लाच मागितली तर तडजोडीअंती 12 हजार रुपयात व्यवहार ठरला. या प्रकरणातही या फौजदाराला लाच (Bribe) रुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. नितीन दशरथ मोरे, असे या फौजदाराचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT