Pune Indigo Flight Emergency Landing  AI Image
मुंबई/पुणे

Pune : इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, उड्डाण करताच तांत्रिक बिघाड; १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला

Pune Indigo Flight News : पुणे विमानतळावर इंडिगोच्या 6E 0623 विमानाचे लँडिंग गिअरमधील तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. १९२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असून मोठी दुर्घटना टळली.

Alisha Khedekar

सागर आव्हाड, पुणे

पुणे विमानतळावर रविवारी सकाळी इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान पुन्हा पुणे विमानतळावर आणले. सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. या विमानातील १९२ प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याने मोठा अपघात टळला.

पुण्याहून गुवाहाटीकडे जाणारे इंडिगोचे 6E 0623 क्रमांकाचे विमान रविवारी सकाळी उड्डाण करून काही अंतरावर गेले होते. त्यानंतर विमानाची चाके आत घेतली जात नसल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने पुणे विमानतळावरील एटीसीला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच विमानतळ प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. भारतीय हवाई दलाकडून पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि बचाव पथके धावपट्टीजवळ तयार ठेवण्यात आली.

विमानाच्या चाकांची स्थिती तपासण्यासाठी वैमानिकाने विमानाची धावपट्टीवरून कमी उंचीवरून फेरी मारली. यामुळे विमानाचे लँडिंग गिअर व्यवस्थित आहे की नाही, हे पाहणे शक्य झाले. त्यानंतर विमानाला उतरवण्याची परवानगी देण्यात आली. अखेर सकाळी ९ वाजून ४ मिनिटांनी विमानाने सुरक्षितपणे जमिनीवर उतरण्यास यश मिळवले. लँडिंगनंतर तीन अग्निशमन गाड्या आणि दोन रुग्णवाहिकांच्या मदतीने विमानाला पार्किंगच्या जागेपर्यंत नेण्यात आले. सर्व काही सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी आपत्कालीन स्थिती मागे घेण्यात आली.

यानंतर विमानाला एरोब्रिज लावून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, प्रवाशांचा पुढील प्रवास सुरू राहावा यासाठी इंडिगोकडून दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जात आहे. बंगळुरूहून पर्यायी विमान पुण्यात आणून त्याद्वारे प्रवाशांना गुवाहाटीला पाठवण्यात येणार आहे.विमानतळ प्रशासन, हवाई दल, एटीसी आणि आपत्कालीन पथकांनी योग्य वेळी केलेल्या कामामुळे मोठी दुर्घटना टळली. सर्व १९२ जण सुरक्षित असल्याने प्रवाशांसह प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Burger Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा बाजारासारखा कुरकुरीत आणि चविष्ट व्हेज बर्गर, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: 2029 पंढरपूरमध्ये विहिरीचा कठडा कोसळून अपघात, चार मजूर अडकल्याची भीती

PF Update: आजच पीएफ जमा करण्याची शेवटची संधी! कंपनीने केली चूक तर व्याजासह भरावा लागणार मोठा दंड

सकाळी नाश्त्यानंतर प्या घरगुती आवळ्याचा ज्यूस: चवीसह आरोग्याला मिळतील भन्नाट फायदे! रेसिपी आत्ताच लिहून घ्या

Ramayana Box Office: बॉक्स ऑफिसवर 'रामायण'चा महाधमाका; १,२२८ कोटींची बंपर कमाई, 'या' सुपरहिट चित्रपटांना टाकले मागे!

SCROLL FOR NEXT