Pune Bhor Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident : नववर्षाच्या पूर्वसंध्येला कार दुचाकीचा अपघात; मद्यधुंद कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवलं, मायलेकाचा मृत्यू

Pune Bhor Accident News : पुण्यातील भोरमध्ये दुचाकी आणि कारची समोरासमोर भीषण धडक. धडकेत मायलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल.

Alisha Khedekar

  • भोर-पुणे मार्गावर कार-दुचाकीची भीषण धडक

  • तेलवडी गावातील नंदा व अमृत धावले मायलेकांचा मृत्यू

  • कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती

  • राजगड पोलिसांकडून चालक ताब्यात, FIR व तपास सुरू

  • नववर्ष स्वागतापूर्वीच कुटुंबावर शोककळा

सचिन जाधव, पुणे

एकीकडे जगभरात सरत्या वर्षाचा निरोप घेऊन, येणाऱ्या वर्षाच्या स्वागतासाठी अवघ जग उत्साहात आहे. झालं गेलेलं मागे विसरतं एक पाऊल नवीन गोष्टींकडे वळवण्यासाठी मनाची तयारी करून पुढे जाण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे, पुण्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला हृदयद्रावक घटना घडली आहे. भोर - पुणे मार्गावर कार आणि दुचाकीची जोरात धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील माय लेकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे अपघात झाला त्यावेळेस कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदा लक्ष्मण धावले आणि अमृत लक्ष्मण धावले असं अपघातात मृत्यू झालेल्या आई आणि मुलाचं नाव आहे. अमृत धावले आणि त्याची आई नंदा धावले हे दोघेही पुण्यातील भोर तालुक्यातील तेलवडी गावात आपल्या कुटुंबियांसह राहतं होते. आज दुपारी २ वाजताच्या सुमारास दोघे मायलेक शेतात जाण्यासाठी निघाले. पण पुढे जाऊन वाटेत काळ उभा असेल याची जरा सुद्धा कल्पना नव्हती.

अमृत आणि नंदा धवले हे दोघेही शेतात जात असताना भोर - पुणे मार्गावरील कासुर्डी गावाच्या हद्दीत समोर येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आणि नंदा आणि त्यांचा मुलगा अमृत या दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे अपघातावेळी अपघात झालेल्या कारमधील चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी भोरच्या राजगड पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच झालेल्या या घटनेने धावले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

SCROLL FOR NEXT