Pune Accident News saam tv
मुंबई/पुणे

Pune Accident: पीएमपी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक हद्दीत ॲक्वेरिअस हॉटेलच्या समोर घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune: पीएमपी बस आणि दुचाकीचा भीषण अपघाताची घटना पुण्यात घडली आहे. या अपघातात दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक हद्दीत ॲक्वेरिअस हॉटेलच्या समोर घडली आहे. (Pune News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, काल रात्री साडेदहा वाजता हा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये पीएमटी बस (एम एच 12 आर एन 9071) स्वारगेटवरुन खानापूरकडे जात होती तर तरुण दुचाकीवरून डोणजे बाजूकडून पुण्याच्या दिशेने येत होते. गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत खडकवासला धरणाला लागून असलेल्या ॲक्वेरिअस हॉटेलच्या समोर बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

या अपघातात आदित्य राजेंद्र देशमुख(वय 22, रा. तनीष सृष्टी, आळंदी देवाची) आणि निलेश मल्लेश मित्रे (वय 22, रा. ताडीवाला रोड, पुणे) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT