Navle Bridge Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: नवले पुलावरील भय संपेना!; अपघातांचं सत्र सुरुच, आजही दोन अपघात

Pune Accident News: तीव्र उतारामुळे नवले पुलावार अपघात होतच आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune Accident News: पुणे-बँगलोर महामार्गावरील नवले पुलावरील अपघाताचं सत्र थांबताना दिसत नाही. आजही नवले पुलावर दोन अपघात झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणहीती जीवितहानी झालेली नाही. तीव्र उतारामुळे नवले पुलावार अपघात होतच आहेत.

नवले पुलावर सकाळी कंटेनरने ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  (Latest Marathi News)

त्याच ठिकाणी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दुसरा अपघात झाला. सुदैवाने त्या अपघातातही जीवितहानी झालेली नाही. महामार्गावर हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बुधवारी देखील येथे कंटेनर व ट्रकचा अपघात झाला होता. ज्यामध्ये कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला होता. (Pune News)

ब्लॅक स्पॉट घोषित

नवले पुलाचा हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी प्रशानसनाकडून काही उपायोजनाही करण्यात आल्या आहेत. कात्रज बोगद्याजवळ पोलीस चौकी देखील उभारण्यात आली आहे. मात्र तरी देखील येथील अपघात थांबल नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Create 80s Retro Photo: कोणताही Prompt न वापरता बनवा 80s च्या काळातील Vintage फोटो; AIचा नवा ट्रेंड व्हायरल

Sweet Corn Soup Recipe: संध्याकाळच्या भूकेसाठी झटपट घरी बनवा गरमागरम स्वीट कॉर्न सूप; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यातील बुधवार पेठेत एफडीएची मोठी कारवाई

CJP Protest MPSC : MPSC विरोधात दिपके मैदानात; विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं पेपरफुटीचा वाद पेटला, MPSC विरोधात CJP आंदोलन उभारणार?

Sugarcane juice: उसाचा रस प्यायल्याने वजन वाढतं का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT