pune accident  Saam tv
मुंबई/पुणे

पुण्यातील गंगधाम चौकात अपघात; पाण्याच्या टँकरची दुचाकीस्वाराला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Pune news : पुण्यातील गंगधाम चौकात अपघात झाली आहे. पाण्याच्या टँकरची दुचाकीस्वाराला धडक दिली आहे.

Vishal Gangurde

पुण्यात पुन्हा भीषण अपघात

पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघाताच्या वाढत्या घटनेने रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुण्यात अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाण्याच्या टँकरच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज शनिवारी पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड गंगधाम चौकात झालेल्या अपघातात 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

पुण्यातील गंगाधाम–बिबेवाडी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार अनिल अल्हाट (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पुण्यात भरधाव धावणाऱ्या वॉटर टँकरमुळे वारंवार अपघात होत असून हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा टँकरच्या वेगावर नियंत्रण,नियमांचे काटेकोर पालन आणि वाहतूक व्यवस्थेवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. टँकर चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

तत्पूर्वी, शहरात पाण्याच्या टँकरमुळे अपघात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बैठक देखील पार पडली. पुण्यातील कोंढवा, एनआयबीएम, उंड्री, पिसोळी भागात उंच इमारती आहेत. परंतु त्यांना पायाभूत सुविधा नसताना इमारतींच्या बांधकामांना परवानगी कशी दिली? असा सवाल बैठकीत विचारण्यात आला.

या अपघातामुळे नागरिकांचा नागरिकांचा बळी जात असल्याचे नागरिकांनी अधोरेखित केले. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. आम्हाला न्याय न मिळाल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत,असे सामाजिक कार्यकर्ते राज सिंग यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: कामाची बातमी! हे Aadhaar App कायमचं होणार बंद; UIDAI दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मान्सून अंदमानात दाखल; लवकरच महाराष्ट्रात येणार

Face Care: ओपन पोर्स आणि टॅनिंग लवकर कमी करायचंय; मग हा घरगुती टोनर स्प्रे नक्की लावा

फक्त प्रेग्नेन्सी नाही, 'या' कारणामुळेही महिलांच्या पोटात येतात क्रॅम्प्स; वेळीच द्या लक्ष!

Heart Attack: सावधान! हार्ट अटॅक येण्याआधी फक्त छातीत वेदना होत नाहीत; डॉक्टरांनी सांगितली ५ लक्षणे

SCROLL FOR NEXT