Pune Accident News 4 vehicle accident in Kondhwa area one died on the spot two injured Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यातील कोंढावा परिसरात ११ वाहने एकमेकांवर आदळली; एकाचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Pune Kondhwa Accident News: पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात १० ते ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव, साम टीव्ही

Pune Kondhwa Accident News: पुणे शहरातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात १० ते ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस, ट्रक, टिप्पर आणि इतर वाहने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना देखील समावेश असल्याची माहिती आहे. अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अपघातांच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. गुरूवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने स्कूल बससह अनेक वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण जखमी झाले.

दरम्यान, या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार, चांदणी चौक शनिवारपासून खुला

पुण्यातील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. कारण, वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आलेला चांदणी चौकातील नवा उड्डाणपूल उद्या म्हणजेच शनिवारी (१२ ऑगस्ट) वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तीन स्वतंत्र मार्गिका, सेवा रस्त्यांमुळे मुंबईकडे जाणे सुलभ होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार आहे. १० महिन्यांच्या विक्रमी काळात या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT