Pune Police Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Police Corona: पुणे पोलीस दलातील 400 पोलीस कोरोना पॉझिटीव्ह

पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली.

अश्विनी जाधव-केदारी, साम टीव्ही, पुणे

पुणे : राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढत चालली आहे. त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. मुंबईत बहुसंख्य पोलीस कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. पुण्यातही गेल्या काही दिवसात केलेल्या कोरोना चाचणीत पुण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मिळून साधारण 400 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत (Pune 400 Police Found Corona Positive).

पुणे पोलीस आयुक्तालयांतर्गत जवळपास सर्वच पोलिसांची अँटिजेन कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली. यात 400 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत.

राज्यात 24 तासात 46 हजार नवे कोरोना रुग्ण

राज्यात गेल्या 24 तासात 46,406 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 70,81,067 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 34,658 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 66,83,769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासात 36 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,737 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे.

सध्या राज्यात 2,51,828 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 1,367 ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT