Mundhwa Police Station SAAM TV
मुंबई/पुणे

Pune News : पुणे भयंकर घटनेनं हादरलं; पती-पत्नी आणि २ मुलांनी जीवनयात्रा संपवली, कारण आलं समोर

Pune Latest News : पुण्यातील मुंढवा परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध पिऊन सामूहिक आत्महत्या केली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सचिन जाधव

Pune Latest News : भयंकर घटनेनं पुणे हादरलं. पुण्यातील मुंढवा परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध पिऊन सामूहिक आत्महत्या केली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे.

पुण्यातील मुंढवा परिसरात विषारी औषध पिऊन एकाच कुटुंबातील चार जणांनी आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नी आणि दोन मुलांनी सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती आहे. आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. (Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दीपक पुंडलिक थोटे (वय 59) , इंदू दीपक थोटे (वय 45) , ऋषिकेश दीपक थोटे (वय 24) समीक्षा दीपक थोटे (वय १६) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

चौघांचेही मृतदेह विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील चौघांनी जीवनयात्रा संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना महागाईचा दणका! गॅस सिलिंडरनंतर सीएनजीही महागला, पाहा नवे दर

Constant Fatigue And Headache: सतत थकवा अन् डोकेदुखी? 'हे' 6 बदल शरीरात दिसताच व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास पडेल महाग

रायगडच्या दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर

Maharashtra News Live Update: मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र' उपक्रमाचा शुभारंभ

Ramesh Mhatre : डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेला सुप्रीम कोर्टाचा दणका, ५ ऑक्टोबरआधी सरेंडरचा आदेश

SCROLL FOR NEXT