Pune tragic accident CCTV video goes viral  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

दुचाकी स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Pune chakan Accident News : चाकण-तळेगाव मार्गावर दुचाकी स्लीप होऊन धावत्या ट्रेलरखाली गेली. एका तरुणाचा मृत्यू. भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर; रस्त्यावरील खड्ड्यांवरून स्थानिक संतप्त.

Namdeo Kumbhar

सागर आव्हाड, पुणे प्रतिनिधी

Pune tragic accident CCTV video goes viral : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात झालाय. दुचाकी अचानक स्लीप झाली अन् धावत्या ट्रेलरच्या चाकाखाली आली. दुचाकीवरील एका तरूणाचा या अपघातात चिरडून मृत्यू झालाय. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. चाकण-तळेगाव मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खालुम्ब्रे येथील हुंडाई चौकात आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. दोन जण दुचाकीवरून कामाला निघाले होते, त्यावेळी चाकण तळेगाव मार्गावर अचानक दुचाकी स्लीप झाली. त्यामुळे ट्रेलरच्या चाकाखाली दुचाकी गेली. दुचाकीवर पाठीमागे बसलेला व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर चालक जखमी झाला. त्याला तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

चाकण तळेगाव मार्गावर झालेल्या अपघातामध्ये कामगार गजानन बाबुराव बोलकेकर याचा जागीच मृत्यू झाला. या कामगाराच्या शरीराचा अक्षरशः चंदामेंदा झाला. दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला. चाकण-तळेगावमध्ये झालेला हा अपघात भीषण आणि भयावह होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. धावत्या ट्रेलरखाली आल्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीराचा चेंदामेंदा झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घेतली. जखमीला तातडीने रूग्णालयात दाखल केलेा. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पंचनामा करत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, चाकण तळेगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत, असा आरोप स्थानिकांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT