Pune : उरुळी कांचन मध्ये 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार! Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : उरुळी कांचन मध्ये 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार!

ही मुलगी पाला मध्ये झोपली असताना या तरुणाने तिच्यावर दोन वेळा शारीरिक अत्याचार केले.

मंगेश कचरे

पुणे : ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने दोन वेळा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर (Loni Kalbhor) पोलिसांनी एका तरुणावर फिर्याद दाखल केली आहे.

हे देखील पाहा :

हि घटना ऊरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील कॅनॉलच्या कडेला ऊसतोड कामगारांच्या पाला मध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित सतरा वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मालेगाव येथे राहणाऱ्या तरुणावर बलात्काराची (Rape) फिर्याद दाखल केली आहे. पीडित मुलगी ही आपल्या आई-वडिलांबरोबर ऊसतोडणीसाठी उरळी कांचन परिसरात आली आहे.

ऊरुळी कांचन येथील कॅनॉलच्या कडेला हि मुलगी तिच्या कुटुंबासमवेत पालात राहते. ऑक्टोबर महिन्यात ही मुलगी पाला मध्ये झोपली असताना या तरुणाने तिच्यावर दोन वेळा शारीरिक अत्याचार केले. हि बाब तिच्या आई-वडिलांना समजल्याने फिर्याद देण्यात आली असून पोलिस (Police) उपनिरीक्षक चौगुले अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT