अजित पवारांची हजारो कोटीची मालमत्ता जप्त: किरीट सोमय्या यांची माहिती Saam Tv
मुंबई/पुणे

अजित पवारांची हजारो कोटीची मालमत्ता जप्त: किरीट सोमय्या यांची माहिती

मागील 19 दिवसापासून अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीय वरती आयकर विभाग आणि इडीचे छापे सुरू

जयश्री मोरे

मुंबई : मागील 19 दिवसापासून अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीय वरती आयकर विभाग आणि इडीचे छापे सुरू आहेत. हजार करोडोची अजित पवार आणि मित्रपरिवार यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहेत. जरंडेश्वर शुगर फॅक्टरी 600 कोटी, दिल्ली येथील घर 20 कोटी, पार्थ पवार यांचे नरिमन पॉईंट येथील कार्यालय 25 कोटी, गोवा येथील रिसॉर्ट अडीचशे कोटी अशा काही संपत्ती प्राप्तिकर अधिकार्‍यांनी विविध मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

त्याची संपत्ती जप्त करण्यात येत आहे. या संपत्तीचे मालक स्वतः अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार, पुत्र पार्थ पवार त्यांच्या दोन्ही बहिणी विजया पाटील आणि निता पाटील आणि जावई या जप्त केलेल्या संपत्तीचे मालक आहेत. यामध्ये २ बिल्डर मित्र देखील आहेत. यावरती ईडी आणि आयकर विभागाची कारवाई सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून नौटंकी करत आहेत. परमवीर सिंग आणि अनिल देशमुख यांना यांनीच लपवले होते. गेल्या २ वर्षात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी राज्याला लुटले आहे. हे सर्व महाराष्ट्राला मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. विषय वळवण्यासाठी वेगवेगळ्या विषय समोर आणत आहेत. मात्र जनता मूर्ख नाही, असे देखील सोमय्या यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT