प्राध्यापकांनी घेतले कमी लेक्चर्स, मुलांनी लावला थेट फलक Saam tv
मुंबई/पुणे

प्राध्यापकांनी घेतले कमी लेक्चर्स, मुलांनी लावला थेट फलक

फलक बनला चर्चेचा विषय...

प्रदीप भणगे

कल्याण - विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागला तर त्याचे फलक तयार करुन कॉलेज आवारात लावले जातात. तर कधीकधी अटेंडस नसले किव्हा बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीही बोर्डावर लावली जाते. मात्र कल्याण मधील अग्रवाल कॉलेज मध्ये लावलेला फलक सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. आत्ता थेट या कॉलेजने लेक्चर कमी घेणाऱ्या प्राध्यापकांची यादीचा फलक कॉलेजच्या आवारात लावला आहे.

हे देखील पहा -

हा फलक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा प्रकार कल्याणमधील नामांकीत के. एम. अग्रवाल कॉलेजमध्ये घडला आहे. जुलै ते नोव्हेंबर कमी लेक्चर घेणाऱ्या कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सहा प्राध्यापकांची यादी कॉलेजच्या गेटवर लावण्यात आली आहे. ही यादी विद्यार्थ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

याबाबत कॉलेज प्रशासनाने कॉलेज शैक्षणिक कामगिरी चांगली आहे. काही प्राध्यापकांची कामगिरी कमी आहे. त्यांच्या आत्मपरिक्षणासाठी व त्यांच्या कार्यात सुधारणा होण्याकरीता हा प्रकार केला आहे. त्यांच्या विरोधात तूर्तास तरी कोणतीही कारवाई केली जाणार नाही अस सांगितलं.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitafal khanyache Fayde: सिताफळ खाण्याचे 7 आरोग्यदायी फायदे कोणते?

Aadhaar Card Update : आधार कार्डवर नाव किंवा आडनाव बदलायचे आहे? UIDAI ची ही सोपी प्रक्रिया जाणून घ्या

Sleep Problems: रात्री गाढ झोप लागत नाही? 'या' ७ कारणांमुळे होऊ शकते झोप खराब; जाणून घ्या उपाय

Maharashtra News Live Update: फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

SCROLL FOR NEXT