Rameshchandra Patkar Passed Away: 
मुंबई/पुणे

Rameshchandra Patkar Passed Away: लेखक प्राध्यापक रमेशचंद्र पाटकर यांचे वृद्धापकाळाने निधन

Rameshchandra Patkar Passed Away: आयुष्यभर मार्क्सवादी विचारसरणीशी निष्ठापूर्वक बांधिलकी ठेवणाऱ्या प्राध्यापक रमेशचंद्र पाटकर यांचे निधन झाले.

Bharat Jadhav

कलाविषयक महत्वपूर्ण आणि दर्जेदार लेखन करणारे प्राध्यापक रमेशचंद्र पाटकर यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. विल्सन कॉलेजमध्ये मराठीचे लोकप्रिय प्राध्यापक असणाऱ्या रमेशचंद्र पाटकर यांनी आयुष्यभर दृश्यकला आणि दृश्यकलालेखना संदर्भात असलेला ध्यास मनःपूर्वक जोपासला होता.

आज महाराष्ट्रात चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्या अनेकांनी पाटकर यांनी लिहिलेले 'कलेचा इतिहास ' या पुस्तकातूनच कलाइतिहासाचे प्राथमिक धडे गिरवलेत. याशिवाय रमेशचंद्र पाटकर यांनी ' महाराष्ट्राच्या नियतकालिकातील कलाविचार ' हे संशोधनपर पुस्तक अत्यंत चिकाटीने पूर्णत्वास नेऊन महाराष्ट्राच्या कला जगतास मोलाची देणगी दिली. पाटकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यांनी दृश्यकलेच्या क्षेत्रातील सर्वच तरुण कलावंत, कलासमीक्षक आणि कलावंतांना कायमच मनःपूर्वक प्रोत्साहन दिले.

आयुष्यभर मार्क्सवादी विचारसरणीशी निष्ठापूर्वक बांधिलकी ठेवणाऱ्या पाटकर यांनी अनेक देशी व परदेशी लेखक ,लेखिकांच्या लेखांचे आणि कवितांचे मानवतावादी दृष्टिकोनातून भाषांतर केले. लोकवांग्मय गृहातर्फे प्रकाशितही झाले आहे. अत्यंत शांत,सुस्वाभावी ,हसतमुख आणि कायमच विधायक विचार करणारे एक चिंतनशील व्यक्तिमत्व आज आपल्याला सोडून गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods for constipation: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? मग 'हे' ७ पदार्थ समाविष्ट करा, पोट राहील साफ

Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा, ६० कोटींचा डल्ला अन् १०० बनावट खाती, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

SCROLL FOR NEXT