Sharad Pawar Saam Tv
मुंबई/पुणे

राष्ट्रपती निवडणुकीवर मुंबईत खलबते; शरद पवार व मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा निरोप घेऊन मल्लिकार्जुन खरगे यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. सर्व पक्षांची बैठक घेऊन एक उमेदवार निवडण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे , टीएमसी, समाजवादी पक्ष या सर्वांसोबत चर्चा करण्यासाठी सांगितले असल्याचे बोलले जात आहे. वेळ आणि दिवस ठरवून तारीख घेऊ आणि बैठक घेऊ, असंही खरगे म्हणाले.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रपती निवडणुकीसाठी समविचारी लोकांनी चर्चा करण्याची आवश्यकता आहे. १० आणि १९ तारीख आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT