Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

...तर उत्तर प्रदेश अन् महाराष्ट्रात एकाच वेळी राष्ट्रपती राजवट लावा- संजय राऊत

हे महाराष्ट्राच्या बदनामीचं षडयंत्र आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई: राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस स्टेशन मधून परतताना शनिवारी रात्री भाजप नेते किरीट सोमया यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीला गेले आहे. त्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) सडकून टीका केली. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे. तसेच राष्ट्रपती राजवट (President Rule) लावायचीच असेल, तर ती उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि महाराष्ट्र (Maharashtra) दोन्हीकडे एकाच वेळी लावा, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले केंद्रीय गृहसचिवाल भाजपचे शिष्टमंडळ 7 वेळा भेटून आले आहे. आता कोणालातरी ओठाखाली थोडास रक्त आलं म्हणून राष्ट्रपती राजवट लावा सांगायला गेलेत. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात सरकार आल्यापासून 17 बलात्कार झाले असल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला. प्रगायराज प्रकरणाचे उदाहरण देत त्यांनी सांगितलं, तृणमूल काँग्रेसचे (TMC) शिष्टमंडळ त्या मुलीला भेटायला गेले. तिकडे किती बलात्कार झाले चेक करा तुम्ही, तिथे तुम्ही लावताय का राष्ट्रपती राजवट? त्याचीही माहिती केंद्रीय गृहसचिवांना द्यावी, असा टोला राऊतांनी यावेळी भाजपाला लगावला.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये या लोकांना काय काम धंदा नाही. तुम्हाला लॉ अँड ऑर्डर संदर्भात काही प्रश्न असतील तर तुमच्या राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटायला हवं होत. मुख्यमंत्री यांना भेटायला हवं होत, असा सल्ला राऊतांनी यावेळी दिलाय.

हे देखील पहा-

ते म्हणाले, "उत्तर प्रदेशमध्ये 17 बलात्कार झाले, त्याच्याविषयीही सुद्धा कोणी माहिती द्यावी.. राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही ठिकाणी एकदमच लावा. लावा ना.. ढोंग चाललीएत सगळी.. दोन चार लोकं जातात, दिल्लीत उतरतात, पत्रकांराना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात.. गृहसचिवांना भेटतात.. हे महाराष्ट्राला बनमान करण्याचे हे षडयंत्र आहे… अन् हे षडयंत्र असाच सुरु राहील या महाराष्ट्र द्रोही लोकांना लोक जागोजागी चपला मारतील. थोडंसं रक्त काय आलं तर चालले राष्ट्रपती राजवट लावायला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT