preparations for Raj Thackeray's Public Meeting in Pune ... Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : राज ठाकरेंच्या पुण्यातल्या मेळाव्याची अशी सुरुय तयारी...

MNS Preparations for Raj Thackeray's Public Meeting in Pune : या मेळाव्यात सर्वसामान्य मनसैनिकाला जाता येणार नाही तर मोजक्या आणि निमंत्रित लोकांनांच या मेळाव्याला येण्याची परवानगी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला, पुण्याच्या नदीपात्रातली सभा रद्द झाली आता राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुण्यातल्या गणेश कला क्रिडा केंद्र याठिकाणी मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यासाठी मनसेची (MNS) जय्यत तयारी सुरु झाली आहे. येत्या रविवारी म्हणजेच २२ मे ला सकाळी १० वाजता हा मेळावा होणार आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर आणि पुण्यातली (Pune) सभा रद्द झाल्यानंतर रविवारच्या मेळाव्याकडे मनसैनिक आशेनं बघतायत. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी मनसैनिकांकडून करण्यात येत आहे. (preparations for Raj Thackeray's Public Meeting in Pune ...)

हे देखील पाहा -

राज ठाकरेंच्या मेळाव्यासाठी पुणे मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येतेय. यासाठी पुणे शहर कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते बाबू वागस्कर आणि कार्यकर्त्यांनी मेळाव्याच्या तयारीबाबत आढावा घेतला. राज ठाकरेंच्या या मेळाव्याला १२ ते १५ हजार कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे. या सभागृहाची आसनक्षमता कमी असल्याने गर्दी रोखण्याचे आव्हान मनसे पदाधिकाऱ्यांवर असणार आहे, तसेच पोलिसांनाही चोख बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. या मेळाव्यात सर्वसामान्य मनसैनिकाला जाता येणार नाही तर मोजक्या आणि निमंत्रित लोकांनांच या मेळाव्याला येण्याची परवानगी आहे. गणेश कला क्रिडा सभागृहाशेजारील नेहरू स्टेडियममध्ये पार्किंगच्या व्यवस्थेसाठी मनसे पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; 'या' महिलांवर कडक कारवाईचे संकेत

Heart Attack: सकाळी उठल्या उठल्या शरीरात 'हे' ६ बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा झटका

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

Monsoon Picnic Tourism: धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळणारे धबधबे आणि हिरवाईचा साज पाहायचाय? मग ही TOP 10 ठिकाणं नक्की यादीत ठेवा

SCROLL FOR NEXT