वारकऱ्यांच्या सहभागात भूमीपुत्र घालणार सिडको भवनाला घेराव... प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

वारकऱ्यांच्या सहभागात भूमीपुत्र घालणार सिडको भवनाला घेराव...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी ठाणे,रायगड, पालघर येथील भूमीपुत्रांकडून  केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदिप भणगे

डोंबिवली : नवी मुंबई Navi Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी ठाणे,रायगड, पालघर Palghar येथील भूमीपुत्रांकडून केली जात आहे. मात्र भूमिपुत्रांच्या मागणीकडे सरकारकडून Government दुर्लक्ष केले जात असल्याने भूमिपुत्रांनी 24 जून म्हणजे उद्या नवी मुंबई मधील सिडको Cidco भवनाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची जय्यत तयारी भूमिपुत्र कडून केली गेली आहे.preparation for tomorrows agitation is dombavali

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वाद सध्या दिवसेंदिवस चिघळत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांचे नाव देण्याची तयारी केली जात आहे.

हे देखील पहा -

या संदर्भातला ठराव देखील सिडकोकडून घेतला आहे. मात्र या ठरावाला भूमिपुत्रांनी विरोध केला असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी विरोधी पक्षनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांनी केली आहे. आता भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मंगळवारी दिवा,कल्याण,डोंबिवली आणि ग्रामीण परिसरातील भूमिपुत्रांच्या बैठका पार पडल्या आहेत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन, २७ गाव संघर्ष समिती यांनी गावागावात ग्रामस्थांनी बैठका घेत २४ जूनच्या सिडको घेराव आंदोलनात लक्षणीय संख्येत सहभाग घेण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनात वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असून वारकऱ्यांनी देखील सिडकोला रिंगण घालण्याचा निर्धार केला आहे.

त्यामुळे मुंबई,ठाणे, रायगड, पालघर ,नवी मुंबई सह नाशिक मधील घोटी परिसरात झालेल्या १० तारखेच्या साखळी आंदोलनानंतर आता २४ जूनच्या आंदोलनातची जय्यत तयारी भूमिपुत्र संघटनांकडून केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT