मुंबै बँक : प्रविण दरेकर 'मजूर' नाहीत; सहकार विभागाने ठरवलं अपात्र Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबै बँक : प्रविण दरेकर 'मजूर' नाहीत; सहकार विभागाने ठरवलं अपात्र

प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गामधून अर्ज भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबै बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गामधून अर्ज (Application) भरला होता. यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहकार विभागाने (Co-operation Department ) या तक्रारीची दखल घेत चौकशीनंतर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) हे मजूर नसल्याचे सांगत त्यांना अपात्र ठरवले आहे. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र (Ineligible) असल्याचे सहकार विभागाने सांगितले आहे.

हे देखील पहा-

विधान परिषदेमध्ये (Legislative Council) विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने तुम्ही मजूर आहात का? अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. यावर आता सहकार विभागाने चौकशी करत दरेकर मजूर नसल्याचे अहवाल दिले आहे. सहकार विभागाने प्रविण दरेकर यांना अपात्र ठरवताना अनेक गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. मजूर (Labor) म्हणजे अंगमेहनतीचे आणि शारिरीक श्रमाचे काम करणारी व्यक्ती, तसेच त्याचे उपजिविकेचे मुख्य साधन हे मजुरीच असणार आहे. मात्र, दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी (Election) दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे यावेळी नमूद केले आहे.

दरेकर यांची मालमत्तासुद्धा २ कोटी ९ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या नावावर ९० लाख रुपयांची संपत्ती असल्याचे विधान परिषदेवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे. शिवाय विधान परिषदेचे सदस्य म्हणून अंदाजे अडीच लाख रुपये मासिक उत्पन्न प्राप्त होत असल्याचे देखील दिसून आल्याने तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असेही सहकार विभागाने त्यांच्या आदेशामध्ये स्पष्ट केले आहे. दरम्यान, मजूर म्हणून दरेकर अपात्र ठरले असले तरी त्यांचा मुंबै बँक निवडणुकीच्या निकालावर फारसा परिणाम पडणार नाही. दरेकर हे दुसऱ्या प्रवर्गातून मुबै बँक निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत. शिवाय मुंबै बँकेवर देखील त्यांच्याच पॅनेलने वर्चस्व राखले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT