pravin darekar nawab malik 
मुंबई/पुणे

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : प्रवीण दरेकर

जयश्री मोरे

मुंबई : नवाब मलिक यांचे डोकं ठिकाणावर नाही. त्यांना मानसोपचार तज्ञांकडे जाऊन उपचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. काेणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता, पुरावे सादर न करता केवळ आरोप करत राहणे अशा प्रकारचे काम नवाब मलिक करत आहेत. त्यांनी हाजी अराफत शेख आणि मुन्ना यादव यांचे नाव घेतलं माझा त्यांना प्रश्न आहे की हाच त्यांचा हायड्रोजन बॉम्ब होता का? pravin darekar nawab malik devendra fadanvis mumbai news

देवेंद्र फडणवीस यांनी जो स्फोट केला आहे त्यातून ते अजूनही सावरलेले दिसत नाही. कारण त्यांचे सन १९९३ मधल्या बाॅम्ब स्फाेटाशी संबंधित असलेल्या आरोपी सोबतचे संबंध आता समोर आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

नवाब मलिक जे आरोप करीत आहेत आणि आज जे केले ते केवळ फुटकळ आरोप आहेत, त्याला कसलाही आधार नाही असेही दरेकरांनी नमूद केले. आज एसटी कर्मचारी यांचा आक्राेश हा सरकारला दिसत नसल्याची खंत दरेकरांनी व्यक्त केली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT