राष्ट्रवादी कॉग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष; प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप (पहा व्हिडीओ)

राज्यात जिथे-जिथे महिलांवरती अत्याचार होईल तिथे-तिथे हातात कु-हाड घेणार

रोहिदास गाडगे

पुणे : आता भाजपच्या (BJP) एका हातात कुऱ्हाड तर दुसऱ्या हातात कमळ, कु-हाड हि अन्याय अत्याचाराच्या विरोधात उघारली जाते. राज्यात जिथे जिथे महिलांवरती अत्याचार होईल तिथे तिथे हातात कु-हाड घेणार, राज्यातील होणा-या अत्याचाराच्या घटनांवर आज भाजपाने हातात हत्यार घेतल आहे. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला (NCP) गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचे मुके घेणारा, सभेदार, कारखानदार,(Manufacturer) बँका आणि उद्योगपतींचा (Industrialists Party) पक्ष आहे, असा गंभीर आरोप केलाय विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. ते क्रांतीवीर उमाजी नाईक (Umaji Naik) यांच्या जयंती निमित्याने रामोशी समाजाला संबोधीत करत असताना शिरुर येथे बोलत होते. (Pravin Darekar accuses NCP)

पहा व्हीडीओ-

16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लावणीसम्राट सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांचा प्रवेश होणार आहे सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी (Pravin Darekar) राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

'मविआ' सरकार म्हणजे आळवावरचे पाणी

राज्यात होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात भाजपाने रामोशी समाजाचे हत्यार असलेली कु-हाड हातात घेतली आहे आता आयऱ्या गयऱ्यांच्या भितीला घाबरायचे नाही. यांची सत्ता म्हणजे आळवावरचे पाणी. रात्री पण माहिती नसतं सकाळी राहिल का तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत मात्र रोज एकमेकांचे कपडे काढायचे काम करतात असा गंभीर आरोप दरेकरांनी यावेळी केला आहे.

महिला अत्याचार,गुन्हेगारी प्रवृत्तीवर सरकारचा अंकुश नाही.

राज्यात महिलांवर अत्याचार, बलात्कार, विनयभंग होतात अन पुण्यनगरीत एक दिवस असा नाही कि बलात्कार अत्याचार होत नाही. राज्यातील या अत्याचार, बलात्काराच्या घटना घडतात या सर्व गोष्टीला या नालायक सरकारचा नाकार्तेपणा जबाबदार असुन सरकारचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश नाही यांचे प्राधान्यक्रम या अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी नाही तर सत्ता टिकविण्यासाठी सुरुय असल्याचा गंभीर आरोपही दरेकरांनी केला आहे.

रामोशी समाजाला नेतृत्व देणार

रामोशी समाज भाजपाच्या मागे उभा आहे या समाजाला भविष्यात नेतृत्व देण्याची किमया भाजपा करणार आणि लवकर रामोशी समाजाला पुढील काळात लोकप्रतिनिधी देणार असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : ईईssssss....आईस्क्रीममध्ये आढळली सापाच्या पिल्लाएवढी कीड, खाण्याआधी दहा वेळा विचार करा!

Moti Mangalsutra Designs: वटपौर्णिमेला खास लूक हवा? मोती मंगळसूत्राच्या या 7 ट्रेंडी सुंदर डिझाइन्स नक्की पाहा

Maharashtra News Live Update: परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

पब्लिक ट्रान्सपोर्टमधला जबरदस्त चमत्कार! एकाच स्टेशनवर थांबणार मोनो, मेट्रो आणि मुंबई लोकल

Chanakya Niti: ही ५ ठिकाणं, तिथं कंजूषपणे वागा; कधीच होणार नाही पाकीट रिकामं, बँक बॅलन्स तर कडकच!

SCROLL FOR NEXT