Pravin Darekar News Saam Tv
मुंबई/पुणे

प्रवीण दरेकर पोलीस ठाण्यात दाखल; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

मुंबई बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : मुंबई बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस (Mumbai Police) चौकशी करणार आहेत. या चौकशीसाठी दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहे. यावेळी दरेकरांच्या (Praveen Darekar) समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

हे देखील पहा-

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबै बँक घोटाळ्या प्रकरणात पोलिसांनी (police) नोटीस दिली होती. त्यानंतर दरेकरांना आज पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील (state) मविआ सरकारच्या नेत्यांना केंद्रीय यंत्रणा रडारवर घेत असल्याचा आरोप होत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता ही राजकीय खेळी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होत आहेत. प्रवीण दरेकरांनी मजूर कोट्यातून अर्ज दाखल केला होता. ते ज्या त्या मजूर संस्थेतून निवडून गेले आहेत, त्या संस्थेचे पद देखील बोगस असल्याचे आरोप झाले आहेत. यानंतर सहकार खात्याने दरेकरांना नोटीस पाठवली होती. तसेच तक्रार दाखल करण्यात आल्याने आता दरेकरांना रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हायचे आहे.

प्रवीण दरेकर यांची बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु, सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले आहे.आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक (Election) लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ही नोटीस बजावण्यात आली. यानंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यासाठी दरेकरांना आता पोलीस ठाण्यात हजर व्हावं लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT